लोकांना कृती करण्यास प्रेरित करणाऱ्या आकर्षक जाहिराती कशा तयार करायच्या ते जाणून घ्या.
तुमचे ॲड क्रिएटिव्ह सेट करा
- Add Activity to Favorites
लोकांना कृती करण्यास प्रेरित करणाऱ्या आकर्षक जाहिराती कशा तयार करायच्या ते जाणून घ्या.
जाहिराती लक्ष वेधण्यासाठी इतर अनेक कंटेन्टसोबत स्पर्धा करतात. यशस्वी झालेल्या जाहिराती सामान्यतः व्हिज्युअली उत्कंठावर्धक असून त्यामध्ये प्रॉडक्ट किंवा सेवा मनोरंजक पद्धतीने दाखविले असते. जाहिरातीमध्ये कृती करण्याचे स्पष्ट आवाहन देखील असते.
जाहिरातीचा व्हिज्युअल घटक सामान्यतः लोकांच्या लक्षात येणारी पहिली गोष्ट असतो. ते एखाद्या व्यवसायाबद्दल अधिक जाणून घेण्यास किंवा विशिष्ट कृती करण्यास इच्छुक आहेत की नाही हे निर्धारित करेल.
जाहिरातीचे क्रिएटिव्ह घटक आणि लक्ष वेधून घेणारी जाहिरात कशाप्रकारे डिझाईन करायची याचे बारकाईने निरीक्षण करूया.
जाहिरातीचे तीन मुख्य क्रिएटिव्ह घटक असतात. तहरीशा ने Little Lemon साठी तयार केलेली सॅम्पल जाहिरात जवळून पाहूया.
जाहिरातीच्या व्हिज्युअलला पूरक असलेला मजकूर समाविष्ट करा. लोक पटकन वाचतात, त्यामुळे तुमचा मजकूर संक्षिप्त आणि मुद्देसूद असल्याचे सुनिश्चित करा.
तहरीशाने पुढील कॅप्शन समाविष्ट केले आहे: तुमच्या आवडत्या Little Lemon डिशेस, आता मोठ्या ग्रुप्ससाठी उपलब्ध आहेत.
ही तुमच्या प्रेक्षकांना दिसणारी पहिली गोष्ट असते. समर्पक आणि लक्षवेधक प्रतिमा किंवा व्हिडिओ निवडा.
तहरीशा ने प्रतिमा निवडली आहे जी नवीन Little Lemon मेनू आयटम दर्शवते.
हे बटण लोकांना त्वरित कृती करण्यास प्रेरित करते. लक्षात घ्या की सर्व जाहिरातींमध्ये बटण नसते, कारण ते तुम्ही निवडलेल्या उद्दिष्टावर अवलंबून असते.
तहरीशा ने आता ऑर्डर करा हे अॅक्शन बटण समाविष्ट केले आहे. ग्राहक या बटणावर टॅप करतात, तेव्हा त्यांना Little Lemon च्या वेबसाईटवर नेले जाईल आणि त्यांना तेथे मेनू दिसेल.
तुम्ही कृती बटण समाविष्ट करून लोकांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कृती करण्यासाठी प्रोत्साहित करू शकता. कोणकोणते कृती बटण उपलब्ध आहेत ते जवळून पाहूया.
लक्षात घ्या की यापैकी काही पर्याय व्यवसाय श्रेणीनुसार उपलब्ध नसतील.
उद्दिष्ट | बटण |
लोकांसाठी प्रवासाची सुविधा बुक करणे किंवा अपॉइंटमेंट घेणे सोपे करा. | आता बुक करा |
लोकांसाठी रेस्टॉरंटमधून ऑर्डर करणे सोपे करा. | आता ऑर्डर करा |
लोकांसाठी त्यांच्या फोनच्या एका टॅपने व्यवसायाच्या ठिकाणी कॉल करणे सोपे करा. | आता कॉल करा |
अधिक लीड प्राप्त करण्यासाठी लोकांना वेबसाईटवरील फॉर्मवर घेऊन जा. | आमच्याशी संपर्क साधा |
लोकांना Facebook वरून व्यवसायाला मेसेज करणे सोपे करा. | मेसेज पाठवा |
अधिक लीड आणि सबस्क्रायबर प्राप्त करण्यासाठी लोकांना वेबसाईटवरील फॉर्मवर घेऊन जा. | साइन अप करा |
लोकांना Facebook Business पेजवरील फॉर्मवर घेऊन जा जेणेकरून ते व्यवसायाविषयीच्या अधिक माहितीची विनंती करू शकतील. | कोट प्राप्त करा |
लोकांना पेज किंवा वेबसाईटवर व्हिडिओ पाहण्यासाठी प्रोत्साहित करा. | अधिक पहा |
लोकांना ते व्यवसाय, प्रॉडक्ट किंवा सेवेबद्दल अधिक जाणून घेऊ शकतात अशा ठिकाणी निर्देशित करा. | अधिक जाणून घ्या |
वेबसाईट किंवा Facebook business पेजवर प्रॉडक्ट पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी अधिक लोकांना प्रेरित करा. | आता खरेदी करा |
Facebook business पेजवर ऑफर पाहण्यासाठी आणि क्लेम करण्यासाठी अधिक लोकांना प्रेरित करा. | ऑफर प्राप्त करा |
डाऊनलोड किंवा एंगेजमेंट वाढवण्यासाठी लोकांना अॅपवर घेऊन जा. | ॲप वापरा |
लोकांना गेम डाउनलोड किंवा प्ले करण्यासाठी सक्षम करा. | गेम प्ले करा |
Tahrrisha साठी खालील ध्येयासोबत समर्पक अॅक्शन बटण मॅच करा.
लोकांसाठी रेस्टॉरंटमधून ऑर्डर करणे सोपे करा.
लोकांसाठी प्रवासाची सुविधा बुक करणे किंवा अपॉइंटमेंट घेणे सोपे करा.
आता तुम्हाला जाहिरातीचे तीन क्रिएटिव्ह घटक माहित आहेत, तुम्ही ते सर्व कसे एकत्र ठेऊ शकता ते जवळून पाहूया.
व्यवसायाच्या ध्येयाशी जुळणारे स्वरूप निवडा.
तुमच्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ शकेल असे व्हिज्युअल निवडा.
क्रिएटिव्हला पूरक असे कॅप्शन लिहा.
जाहिरात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कशी दिसते ते तपासा.
आपण पुढील धड्यात, आकर्षक जाहिराती तयार करण्यात मदत करण्यासाठी काही क्रिएटिव्ह धोरणे एक्सप्लोर करणार आहोत.
जाहिरातीच्या तीन क्रिएटिव्ह घटकांमध्ये अॅड व्हिज्युअल, मजकूर आणि अॅक्शन बटण समाविष्ट असते.
लोकांना कृती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अॅक्शन बटण जोडा.